अलिबाग येथे एड्स केंद्रात कार्यशाळा

| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड यांचे संयुक्त विद्यमाने एआरटी केंद्र, जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे एचआयव्ही सह जगणार्‍या व्यक्तीकरिता कायदेविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक रायगड यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत डॉ. नालंदा पवनारकर, अमोल शिंदे, संजय माने, आदींनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन सुशील साईकर, आभार प्रदर्शन संजय माने, यांनी केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग व मोबाईल आयसीटीसी व्हॅन, एआरटी येथील अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

Exit mobile version