जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

सुमित, थांगावेलू, एकताचे सुवर्ण यश

| कोबे (जपान) | वृत्तसंस्था |

विद्यमान ऑलिंपिक विजेत्या भारताच्या सुमित अंतिलने येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत एफ गटातील भाले फेकीतील आपले विजेतेपद कायम राखले. तर थांगावेलू मरियप्पन आणि एकता भायन यांनीही आपापल्या गटात सुवर्णपदके जिंकली, त्यामुळे भारताने तिसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारतीयांनी आज एकूण पाच पदकांची कमाई केली. भारताची एकूण पदक संख्या 10 (4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 ब्राँझ) इतकी झाली आहे. पदकतक्त्यात चीन (41 पदके) पहिल्या स्थानावर तर ब्राझील 25 पदकांसह दुसर्‍या स्थानावर आहे. अंतिलने 2023 मधील टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. आज त्याने 69.50 मीटर लांब भाला फेकला. एफ 64 विभागात तो सध्याचा जागतिक विक्रमवरही आहे. या जागतिक पॅरा स्पर्धेत भारताच्या संदीपने ब्राँझपदक मिळवताना 60.41 मीटर अशी कामगिरी केली.

सोनीपत येथे स्थाईक असलेल्या अंतिलला कुस्तीपटू व्हायचे होते. त्यात तो प्रगतीही करीत होता; परंतु 2015 मध्ये त्याची मोटारबाईक ट्रकवर आदळली आणि त्याला मोठ्या अपघाताचा सामना करावा लागला. त्यात त्याचा डावा पाय निकामी झाली. त्यानंतर कुस्ती सोडून तो पॅरा तिरंदाजीत खेळू लागला.

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणार्‍या मरियप्पनने टी-63 उंच उडीत सुवर्णपदक मिळवताना 1.88 मीटर अशी कामगिरी केली. आठ वर्षांतील त्याचे हे पहिले सुवर्णपदक आहे. 2016 मधील रियो पॅरालिंपिक स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले होते. महिलांच्या एफ 51 हातोडा फेकत 20.12 मीटर अशी कामगिरी करत सुवर्णपदकावर आपला हक्क सिद्ध केला. याच प्रकारात भारताची आणखी एक खेळाडू कशिश लाक्रा हिने 14.56 अशा कामगिरीसह रौप्यपदक मिळवले.

Exit mobile version