। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
नांदोस येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यामाने तालुकास्तरीय जागतिक मृदा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्त कृषि विज्ञान केंद्र, किर्लोसचे विषय विशेषज्ञ डॉ.विलास सावंत यांनी उपस्थितांना माती परिक्षणाचे महत्त्व, पिकांच्या सुयोग्य वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये, सेंद्रिय शेतीचे महत्त्व याविषयावर मार्गदर्शन लाभले. तर कृषि सहाय्यक स्नेहा चौखंडे यांनी माती परिक्षणासठी माती नमुना घेण्याची पध्दत याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी नांदोस सरपंच आरती नांदोसकर, कृषि पर्यवेक्षक सिताराम परब, ग्रामसेवक सुशांत चौगुले, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश गोसावी, कृषि सहाय्यक पवनकुमार सौंगडे, मंदार सरमळकर, अमृता भोगले, विद्या कुबल, सुषमा धामापूरकर, स्नेहा चौखंडे, मनिषा गिते व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
दिपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरूवात झाल्यानंतर उपस्थितांनी जमिन आरोग्य अबाधित राखण्याविषयी प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी
अधिकारी विश्वनाथ गोसावी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कृषि सहाय्यक पवनकुमार सौंगडे यांनी केले.