आ. जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील साने गुरुजी विद्यानिकेतन सानेगाव-यशवंतखार विद्यालय येथे दि. 4 डिसेंबर रोजी रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाची जिल्हा निवड अजिंक्यपद चाचणी आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. या कुस्ती अजिंक्यपद निवड चाचणीचे आयोजन रोहा तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे यांनी केले होते.
यावेळी शिक्षक आ. बाळाराम पाटील, माजी आ. पंडित पाटील, धैर्यशील पाटील, पं. समिती माजी सभापती लक्ष्मण महाले, संतोष भोईर, शंकरराव म्हस्कर, खो-खो संघाचे आयोजक व ग्रामस्थ तसेच कुस्तीप्रेमी व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या खेळाकरिता अलिबाग, पेण, पनवेल, कर्जत खालापूर, महाड अशा विविध ठिकाणांहून खेळण्याकरिता महिला व पुरुष गट आले होते. तर, खेळ पाहण्याकरिता जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या अनेक दिग्गज मंडळी व ग्रामस्थ या सर्वांनी खेळाडूंना शुभेच्छा देत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर सायंकाळी जिंकणार्या सर्व संघांना रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचिन्ह, रोख रक्कम, शाल, श्रीफळ व जर्सी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या की, कोणताही कार्यक्रम आयोजित करणे तितकं सोपं नसते. त्यामुळे आयोजकांना खूप मोठी कसरत करावी लागते. आयोजकांनी अल्पावधीत मोठी तयारी केली असल्याने त्यांची जिद्द व काम करण्याच्या पद्धतीला माझा लाल सलाम, असे गौरद्गार काढले.
कार्यक्रमासाठी नंदूशेठ म्हात्रे व परेश म्हात्रे यांनी तसेच रा.जि. व रोहा तालुका कुस्तीगीर संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी तसेच यशवंत ग्रामस्थ व महिला मंडळ व उत्कर्ष मुंबई मंडळ, आई वरदायिनी मित्र मंडळ, भेरवनाथ इलेहन व भैरवनाथ कबड्डी मंडळ, भजनी मंडळ, आदिवासी वाडी यशवंतखार, पंचक्रोशी चालक-मालक संघटना यांनी मोलाचे सहकार्य केले.