साहित्यिकांनी विद्यार्थ्यांवर काही लिहावे: प्रा.एल.बी. पाटील

| अलिबाग | प्रतिनिधी |

नीट पेपर फुटी विरोधात दिल्लीतील जंतर मंतरवर सोनम वांगचुक शांतपणे आमरण उपोषण करीत होते. तसेच, त्यांना साथ देणारे अभिजित दिपके यांच्या सोबतच्या विद्यार्थ्यांचा लढा शांतपणे होत असताना, तो लढा चिरडण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न लोकशाही आणि देशासाठी फारच घातक ठरले आहे. सोनम वांगचुक यांना उपोषणातून उचलून दवाखान्यात नेणे, विद्यार्थ्यांना पळवून पळवून लाठ्या काठ्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारणे, तरुणींच्या अंगावरचे कपडे फाडणे, मारहाण करणे, लढ्यातील विद्यार्थ्यांचा तंबू उखडणे, तरुणांना हुसकावून लावणे इत्यादी झालेली कृत्ये फारच भयानक असून लोकशाहीला लांछनास्पद आहेत. हे कोणत्याही सुविचारी माणसाला आवडणारे नाही. त्यामुळे साहित्यिकांनी या विषयावर लिहून त्या युवा पिढीला, त्यांच्या पालकांच्या वेदनांना न्याय देऊ शकाल. भविष्याला आपले पवित्र, न्याय्य विचार धडा ठरणार आहे. आपण आपल्यासाठी आणि लोकांसाठी काही केल्याचे आत्मिक समाधान लाभणार आहे. त्यासाठी लिहू या, असे आवाहन साहित्यरत्न प्रा. एल.बी. पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version