| म्हसळा | वार्ताहर |
यादव गवळी समाजाचा वर्धापनदिन प्रथम वर्धापनदिन कार्यक्रम खांदा कॉलनी येथील जनसेवा आश्रम ट्रस्टच्या सभागृहात रविवार (दि.21) आयोजित करण्यात आला होता. नवी मुंबई पनवेल सारख्या विभागात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बहुतांश गवळी बांधव आपल्या नोकरी व व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या बांधवाना एका छताखाली आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वर्धापन दिनानिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास महाराष्ट्र यादव चॅरिटी शिखर संस्थेचे अध्यक्ष अजय बिरवाटकर, अशोक दाते, गणेश साबळे, नरेश काते,अनिल काते, सुनील लटके, सुहास महागावकर, गणेश वाजे, नारायण रिकामे, अशोक काते, सुभाष काते, किशोर लाड, देवेंद्र काते, संदेश काते, प्रमोद तटकरे, बाळकृष्ण महाडिक, मेघनेश वाजे, सुनील वाजे, शैलेश काते तसेच पनवेल, नवी मुंबई विभागातील सर्व समाज बांधव आणि महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अनिल काते तर आभार प्रदर्शन किशोर लाड यांनी मानले.
यादव गवळी समाजाचा वर्धापनदिन
