। न्यूयॉर्क । वृत्तसंस्था ।
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला आणि यंदा सहा विविध विजेतेपद मिळवणारा यानिस सिन्नर मार्च महिन्यात दोनदा उत्तेजक चाचणीत दोषी सापडला होता. तरी त्याला गैरकृत्यातून स्वतंत्र न्यायाधिकरणाने मुक्त केले, अशी माहिती आंतरराष्ट्रीय टेनिस इंटिग्रिटी एजन्सीने उघड केली. हाच सिन्नर आता पुढील आठवड्यात सुरू होणार्या यूएस ओपन स्पर्धेत खेळण्यास सज्ज होत आहे. सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याकडून मसाज आणि स्पोर्टस थेरपीद्वारे ‘अॅनाबॉलिक एजंट क्लोस्टेबोल’ हे अमली पदार्थ आपल्या शरीरार गेल्याचे सिन्नरने सांगितले होते.