यशश्री आणि आरोपीच्या मोबाईलचा शोध सुरू

दोघांचा मोबाईल महत्त्वाचा पुरावा

| उरण | वार्ताहर |

उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासादगरम्यान नवनवीन ट्विस्ट येत आहेत. यशश्रीच्या हत्येनंतर अटक करण्यात आलेला आरोपी दाऊद शेखची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. आरोपी त्याचा आणि यशश्रीचा मोबाइल कुठे टाकलाय हे पोलिसांना सांगत नाहीये. पोलीस या दोघांचा मोबाईल शोधत आहे. या प्रकरणामध्ये माबोईल हाच मोठा पुरावा आहे. पण, अद्याप पोलिसांना तो सापडला नाही. दाऊद शेखने यशश्रीच्या हत्येनंतर पुरावा नष्ट केल्याचे बोलले जात आहे.

यशश्रीची हत्या केल्यानंतर दाऊदने स्वत:चा मोबाईल फॉरमॅट केला. यशश्रीचा मोबाईल त्याने घटनास्थळावरून काही अंतरावर जाऊन फेकून दिला, असे पोलीस तपासात समजत आहे. पोलीस हा मोबाईल शोधत आहेत. दाऊदने या हत्या प्रकरणातला महत्त्वाचा पुरावाच नष्ट केला असल्याचे बोलले जात आहे. जर दोघांपैकी एकाचा जरी मोबाईल सापडला, तरी या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येऊ शकतात. पोलीस आता सर्व बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी गुरूवारी (दि. 1) आरोपीला घटनास्थळावर आणले होते.

दरम्यान, यशश्री शिंदेचा शवविच्छेदन अहवाल बुधवारी समोर आला. या शवविच्छेदन अहवालामधून धक्कादायक माहिती उघड झाली होती. यशश्री शिंदेच्या शरीरावर दोन टॅटू आढळून आले होते. यामधील एक टॅटू आरोपी दाऊद शेखच्या नावाचा होता. यशश्रीने दाऊदचे नाव आपल्या शरीरावर कोरले होते. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. पोलीस आता या बाजूनेदेखील तपास करत आहेत. यशश्री शिंदेचा मारेकरी दाऊद शेख सध्या तुरुंगात आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

Exit mobile version