दत्त जयंतीनिमित्त यात्रेचे आयोजन

| उरण | वार्ताहर |

उरणमध्ये दत्तजयंती उत्सवानिमित्ताने भरली जात असलेल्या यात्रेत हजारों यात्रेकरूंनी भरली आहे.परिसरातील चिरनेर, मोरा आदी विविध ठिकाणची दत्त मंदिरे भाविकांच्या गर्दी फुलून गेली आहेत. उरण शहरातील दत्तजयंती निमित्ताने भरलेल्या यात्रेला रविवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे.उरण शहरातील वैष्णवी हॉटेलपासून चारफाटा ,कोटनाका दरम्यानचे एक किमीच्या रस्त्यावर विविध प्रकारची शेकडो दुकानं लावण्यात आली आहेत.यात्रेत खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

उरण शहरातील एनआय हायस्कूल समोरील पटांगणात सर्वांसाठी आकाश पाळणे, मौत का कुआ, तोरा-तोरा, ड्रॅगन ट्रेन,कोलंबस,मिनी ट्रेन आदी करमणूकीची साधने लावण्यात आली आहेत. खाण्यापिण्यासाठीही ठिकठिकाणी पाव-भाजी, पिझ्झा, मालवणी,न्युडल्स, कुल्फी अशी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आली आहेत. यात्रेत हार, फुले, पेढे,नारळ, मिठाईची दुकाने, अलंकार, भांडी, वस्तू, कपडे,बच्चेकंपनीसाठी आकर्षक खेळणी आदींची मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटण्यात आली होती.

Exit mobile version