रायगडात यलो अ‍ॅलर्ट ; मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | प्रतिनिधी |
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं येत्या एक ते दोन दिवसात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागानं औरंगाबाद, जालना, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला असून बुधवारी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्याला ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने काल वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात पावसानं हजेरी लावली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, लातूर, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, बुलडाणा, जळगाव, अहमदगर, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना यलो अ‍ॅलर्ट देण्यात आला असून बुलडाणा,वाशिम, जालना, बीड, अहदनगर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना 18 ऑगस्टसाठी यलो अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

Exit mobile version