| उरण | वार्ताहर |
आत्माराम ठाकूर मिशन संचालित जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे व श्री अंबिका योग कुटीर, ठाणे, शाखा नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील आवरे येथे योग शिबिर संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री अंबिका योग कुटीर ठाणे, नवी मुंबईचे विभागीय संचालक उत्तमराव पवार यांनी केले. शिबिरात एकूण 208 विद्यार्थ्यांनी व 10 शिक्षकांनी भाग घेतला होता. संजय भोसले, शशिकांत पाडेकर, विनोद भूजोनेय, मिलिंद नारखेडे, रत्ना प्रभू, सुविधा शर्मा, संध्या सानस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अशोक ठाकूर, निकिता म्हात्रे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यास शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.