नागोठणे | वार्ताहर |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रोहा-अष्टमी यांच्यावतीने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत नागोठण्याजवळील शेतपळस (ता.रोहा) गावचे सुपुत्र योगेश डाकी यांनी गड आला पण सिंह गेलाफफ या विषयावर रांगोळी काढून सलग दुसर्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ नुकताच खा. सुनील तटकरे व पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी योगेश डाकी यांना प्रथम क्रमांकाचे रक्कम रु. 5001 चे रोख पारितोषिक, सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले.