। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग पुन्हा चर्चेच्या गर्तेत आले आहेत. त्यांनी नुकतेच एमएस धोनी आणि कपिल देव या भारताच्या विश्व चषक विजेत्या कर्णधारांवर कडू शब्दात टीका केली आहे. यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोलचाही सामना करावा लागत आहे. दरम्यान, योगराज यांनी धोनी आणि कपिल देव यांच्यावर यापूर्वी अनेकदा टीका केली आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला असून यावेळी कपिल देव यांच्यावर राग व्यक्त केला आहे. तसेच, योगराज यांनी कपिल देव आणि युवराज सिंग यांच्या कामगिरीची तुलना केली आहे. त्यांनी एकप्रकारे युवराजच्या माध्यमातून कपिल देव यांच्याबरोबरचा बदला पूर्ण केल्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
योगीराज यांनी दावा केला होता की, योगराज यांना 1981 मध्ये कपिल देव यांनी संघातून बाहेर केले होते, त्यानंतर त्यांच्यात वितुष्टता आली होती. त्यांनी म्हटले होते की, कपिल त्यांना त्यांचे सर्वात मोठे स्पर्धेक मानत होते. या घटनेनंतर योगराज यांनी बदला घेण्याचा निर्णय घेत आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना योगराज काय आहे, हे जगाला दाखवायचे होते. योगराज पुढे म्हणाले की, मी त्या वक्तीबद्दल बोलत आहे, तो व्यक्ती म्हणजे तुमचा सर्वकालिन दिग्गज कर्णधार मिस्टर कपिल देव. मी त्याला सांगितले होते की, मी तुझे ते हाल करेन की जग तुझ्यावर थुंकेल. आज युवराजकडे 13 ट्रॉफी आहेत आणि त्याच्याकडे फक्त एक विश्वचषक आहे.