बायको नांदायला येत नाही म्हणून पठ्ठ्याने काय केले पहा…

। माणगाव । सलीम शेख ।
माणगाव तालुक्यातील इंदापूर गावच्या हद्दीत रेल्वे ट्रकवर आत्महत्या करण्यास गेलेल्या तरुणाचे प्राण माणगाव पोलिसांनी तत्परता दाखवून वाचविल्याची घटना ताजी असतानाच अशाच प्रकारची दुसरी घटना घडली आहे. कोस्ते आदिवासी वाडीतील तरुण विजेच्या टॉवरवर चढून आत्महत्या करीत असतानाच पोलिसांनी तत्परता दाखवून या तरुणाचेही प्राण वाचविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना गुरुवारी (दि.4) सायंकाळी 4 वाजण्याच्याा सुमारास घडली.

कोस्ते आदिवासी वाडी येथील तरुण अनिल गोपाळ जाधव (वय 23) याचे पत्नीसोबत वाद झाले होते. अशातच विनवणी करुनही पत्नी सोबत नांदण्यास तयार होत नसल्याच्या कारणाने तो उच्च दाब विद्युत टॉवरवर आत्महत्या करणासाठी चढल्याची माहिती माणगाव पोलिसांना मिळाली.

याबाबत माहिती मिळताच, माणगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, सपोनि नवनाथ लाहंगे, सपोनि सतिष आस्वर, पोलीस हवालदार तुणतुणे, पोलीस नाईक खिरीट, पोलीस शिपाई तांदळे, डोईफोडे, शिंदे, सुरवसे यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन त्याला आत्महतेपासून परावृत्त केले.

Exit mobile version