| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील एका लॉजवर महाड तालुक्यातील एका विद्यार्थिनीला आणून तिच्या इच्छेविरूध्द संबंध ठेवल्याप्रकरणी पोलादपूर पोलिसांनी आरोपीला नाशिक येथून अटक करून महाड न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
महाड तालुक्यातील एका तरूण विद्यार्थिनीला दि.21 डिसेंबर 2024 पासून दि.14 फेब्रुवारी 2026 दरम्यान लग्नाचे अमिष दाखवून तिच्या इच्छेविरुध्द पोलादपुर, महाड, ठाणे तसेच नाशिक येथील लॉजवर वेळोवेळी नेऊन जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. त्यातून पीडित तरूणी गरोदर राहिली असतानादेखील तिच्या जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. याप्रकरणी पीडित तरूणीने स्वत: तरुणाविरुद्ध पोलादपूर पोलीस ठाण्यात येऊन हे.कॉ.सुतार यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी प्रसाद जिभाऊ नाडेकर याला पोलादपूर पोलिसांनी तातडीने नाशिक येथे जाऊन अटक केली आणि त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश आर. मुंढे यांनी नाशिक येथून आरोपीस ताब्यात घेतले आणि महाड न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार
