। पनवेल । प्रतिनिधी ।
28 वर्षीय तरुणाने राहत असलेल्या घराच्या हॉलमधील सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेल शहरात घडली. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अतुल वाघेला असे या तरुणाचे नाव असून, या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अतुल वाघेला याने नेमकी कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याचे कारण समजू शकले नसून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
