गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यातील ढालघर येथील तरुणाने घरातील भांडणामुळे नैराश्यातून करंजाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना गुरुवार दि. 29 नोव्हेंबर 2023 रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव विठोबा गणपत तेटगुरे (वय-32) रा. ढालघर असे आहे.

ढालघर येथे राहणारा विठोबा आपली पत्नी व आईच्या रोजच्या भांडणाला कंटाळला होता. याच नैराश्यामधून बैल बांधणीसाठी वापरल्या जाणाऱ्या दावणीच्या दोरीने घराच्या पाठीमागील करंजाच्या झाडाला त्याने गळफास घेतला. त्याला उपचाराकरिता रुग्णवाहिकेमधून माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष अस्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क फौजदार निमकर हे करीत आहेत.

Exit mobile version