तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

खारघरमधील ओवे कॅम्प तलावात बुडून अमन यादव (18) या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत तरुण विद्याविहार येथील एस. के. सोमय्या महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचे निदर्शनास आले. मुंबई-चुनाभट्टी परिसरातील सात ते आठ तरुण खारघरमधील धबधब्यावर आनंद घेण्यासाठी आले होते. पांडवकडा धबधब्यात प्रवेश मनाईमुळे हे तरुण ओवे कॅम्प येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तलावात अंघोळ करण्यासाठी गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाला. एक तरुण बुडाल्याची माहिती खारघर अग्निशमन जवानांना मिळाली. अग्निशमन पथकाकडून तलावात गळ टाकून मुलाचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळला.

Exit mobile version