कोलाड येथे तरुणाचा मृत्यू

| कोलाड | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड कोकण रेल्वे पुलावरुन दारू पिऊन तोल गेल्याने पुलाच्या खाली पडून तरुणाचा दुर्दैवी अंत झाला असल्याची घटना घडली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, दि.27 एप्रिल रोजी 2.53 वा संत रोहिदासनगर कोलाड येथील अभिषेक रवींद्र जानवरकर (30) यांनी कोकण रेल्वे पुलावर दारू प्यायला असता त्याचा दारूच्या नशेत तोल जाऊन तो पुलाच्या खाली असलेल्या खडी व दगडावर आपटला. त्याच्या कपाळाला व नाकातोंडावाटे रक्त येऊन गंभीर स्वरूपाची दुखापत होऊन मयत झाला आहे. याचा अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे पोहवा एस.जे. मोरे हे करीत आहेत.

Exit mobile version