चिरनेर येथे युवा मेळावा

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील चिरनेर येथील पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या विद्या संकुलनात रविवार (दि.21 ) उरण तालुका युवा मेळावा भरविण्यात आला होता. यावेळी जिल्हा निरीक्षक अनिल खारकर यांनी सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करून जनजागृती केली. याप्रसंगी व्यासपीठावर दिपाली पाटील, संगीता पाटील, रमाकांत बंडा, बाबुराव खारपाटील, सुजित पाटील, प्रणिल ठाकूर, भाग्यश्री पाटील, प्रिया पाटील ,परेश गावंड, हृतिक पाटील, किशोर बंडा, मणिलाल गावंड, दशरथ गावंड, त्रिवेणी ठाकूर, सुजाता गोंधळी, मोकल, रूपेश पाटील, स्वामीनाथ गावंड, पांडुरंग भोईर, मुकुंद चोगले, महेश पाटील, संजय पाटील, जयवंत पाटील आणि युवा गुरू बंधू भगिनी उपस्थित होत्या. मेळाव्यात नाच गाण्यांबरोबर संगीत खुर्ची, बकेट बॉल, चमचा गोटी, इत्यादी खेळ घेण्यात आले. या मेळाव्याला तालुक्यातील 135 युवक आणि 27 ज्येष्ठ नागरिक असे एकूण 162 स्त्री-पुरुष उपस्थित होते.

Exit mobile version