| रसायनी | वार्ताहर |
दापिवली येथून 31 वर्षीय दिनेश जगदीश चौधरी राहत्या घरातून कोठेतरी निघून जाण्याची घटना घडली असून, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार पोहवा पानपट्टे यांचा तपास सुरू आहे.
याबाबत रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश जगदीश चौधरी याने आपल्या दुकानातील डायरीत चिठ्ठीत लिहून ठेवले आहे की, पप्पा मी जीवनाला कंटाळलो असून, माझ्यावर खूप कर्ज झाले आहे. त्यामुळे मी दुनिया सोडून जात आहे. ‘मला माफ करा. मी सर्वकाही खतम करून जात आहे. आपला मुलगा…. आय लव्ह यू माय ऑल फॅमिली’ असे लिहून ठेवून कुठेतरी निघून गेला आहे. त्याचे वर्णन अंगाने मध्यम, उंची 5 फूट 2 इंच, चेहरा गोळ, डोळे काळे, केस डोक्याला समोर ठक्कल पडलेले, अंगात नेसून गडद निळ्या रंगाचा टी-शर्ट व फिक्कट पांढर्या रंगाची पँट, डाव्या हातावर असे लिहिलेले आहे. या वर्णनाची व्यक्ती कोणास आढळल्यास तात्काळ रसायनी पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन रसायनी पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.