तरुणाची आत्महत्या

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
शहरातील भगवती किल्ल्यावरील वेताळ बुरुजवरून तरुणाने उडी मारत आत्महत्या केली आहे. अमोल कृष्णा चव्हाण (33) उर्फ मुन्ना असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो मानसिक रुग्ण होता. शनिवारी सायंकाळी भगवती किल्ल्यावर गेलेल्या काही पर्यटकांना तेथील बुरुजाखालील खोल दरीत एक मृतदेह दिसून आला. त्यांनी याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

Exit mobile version