खारघरमध्ये वाहतूक कर्मचार्‍यांची युलू सवारी

नो पार्किंगवाल्यांवर नजर

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

खारघर वसाहतीत नो पार्किंग क्षेत्रात उभ्या करण्यात येणार्‍या चार चाकी वाहनानवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाकडे टोविंग व्हॅन उपलब्ध आहे. मात्र असे असतानाही युलू कंपनीच्या इलेक्ट्रिक बाईक वर फिरून चार चाकी वाहनानां जॅमर लावण्याचे आणि काढण्याचे काम एक खासगी व्यक्ती करत असल्याचे चित्र वसाहतीत पाहायला मिळत आहे. वाहतूक विभागाच्या अधिकार्‍यांना या बाबत विचारणा केली असता जॅमर लावण्याचे नाही तर फक्त काढण्याचे काम संबंधित व्यक्ती करत असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

वाहतूक विभागाच्या नियमानुसार वसाहती अंतर्गत नो पार्किंग क्षेत्रात उभ्या करण्यात येणार्‍या चार चाकी वाहणानवर जामर लावून कारवाई करण्यात येत असते. मात्र ही कारवाई करण्यापूर्वी टोविंग व्हॅन वर कार्यरत पोलीस कर्मचार्‍यांकडून संबंधित वाहन चालकाला आपले वाहन नो पार्किंग क्षेत्रातून हलवन्यासाठी स्पीकर द्वारे सूचना दिली जाते. मात्र त्या नंतरही वाहन चालकाणे आपले वाहन दुसर्‍या ठिकाणी न हलवल्यास पोलीस कर्मचार्‍याच्या उपस्थित टोविंग व्हॅन वरील कर्मचारी जामर लावण्याचे काम करतात. या सर्व प्रक्रिये दरम्यान जामर लावताना आणि काढतांनाही वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचार्‍यांची उपस्थिती असणे बंधन कारक आहे. खारघर वसाहतीत मात्र या उलट युलू बाईक वर फिरून वाहतूक विभागाकडून नेमण्यात आलेले खाजगी कर्मचारी वाहतूक पोलिसांच्या अनुपस्थितीत कार्यवाही करताना दिसत असल्याने वाहतूक विभागाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

ना ओळखपत्र ना वर्दी
वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक विभागाला अनेकदा खाजगी मदतनीस ( वार्डन ) देण्यात येत असतात. या मदतनीसांना वेगळ्या प्रकारची वर्दी देखील देण्यात येत असते. तर टोविंग व्हॅन वरील कर्मचार्‍यांना देखील वेगळ्या रंगाची वर्दी दिलेली असते. खारघर वसाहतीत जामर काढण्याच काम करणारा कर्मचार्‍याने मात्र कोणत्याही प्रकारची वर्दी अथवा ओळखपत्र वापरत नसल्याने वाहन चालकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version