| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची भिंत म्हणवल्या जाणार्या चेतेश्वर पुजारावर सध्या त्याच्या बॅटिंग परफॉर्मन्समुळे सगळीकडून टीकेची झोड उठली आहे. अनेक टीकाकारांच्या तो सध्या निशाण्यावर आहे.
पुजाराचा बिघडलेला फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. हा तोच पुजारा आहे का, ज्याला भारतीय संघाची भिंत म्हणून ओळखलं जायचं?, असा प्रश्न क्रिकेट रसिकांना अनेक वेळा पडतोय. इंग्लंड दौर्यात त्याने खेळलेल्या तीन डावांत 4 रन्स, नाबाद 12 रन्स आणि 9 रन्स अशी त्याची कामगिरी राहिली आहे. यापेक्षा भयानक आहे की सातत्याने तो एकाच पद्धतीने आऊट होतोय. अशा सगळ्या परिस्थितीत त्याच्या संघातल्या जागेविषयी आता चर्चा सुरु झालीय. त्याला पर्याय कोण, त्याची जागा कोण घेऊ शकतो?, अशा प्रकारची चाचपणीही सुरु झाली आहे.