कर्नाटक, तेलंगणामध्ये सरकारी सुट्टी जाहीर
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्र सरकारने माजी पंतप्रधानांच्या स्मरणार्थ सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तर कर्नाटक सरकारने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत शुक्रवारी (दि.27) शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. कर्नाटकमध्ये सरकारी सुट्टी जाहीर झाल्यानंतर लगेचच, शुक्रवार, 27 डिसेंबर रोजी इतर राज्यांमध्ये शाळा आणि बँकांना सुट्टी असेल की नाही यावर अटकळ सुरू झाली.
तेलंगणामध्येही सुट्टी जाहीर
तेलंगणामधील रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शुक्रवारी सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची घोषणा केल्यानंतर तेलंगणामध्ये आज सुट्टी असेल. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी त्यांचे दिल्लीतील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत.