अलिबाग । शहर प्रतिनिधी |
दर्यासारंग सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांची 292 वी पुण्यतिथी रविवारी अलिबागमध्ये साजरी करण्यात आली. आंग्रे समाधी, जोगळेकर नाका, अलिबाग येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांकडून कान्होजी राजे आंगे्र यांना पुष्पचक्र तसेच पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रशांत नाईक, कमळ नागरी पतसंस्थेचे संस्थापक गिरीश जोशी, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, कान्होजी आंग्रेंचे वंशज रघुजीराजे आंग्रे, नगरसेवक संजना कीर, वृशाली ठोसर, अॅड. गौतम पाटील, अजय झुंझाराव आदी उपस्थित होते. यावेळी कान्होजी राजे आंग्रे यांनी शौर्याने, तसेच त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेने मराठा नौदल आणि नौदलाच्या तळांची स्थापना केली याचे स्मरण केले. त्यांनी रचलेल्या इतिहासाचे नेहमीच स्मरण केले जाईल, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.