। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
काशीद समुद्रात गौरव सिंग यादव (वय32 वर्षे,सध्या रा.खोपोली, मूळ राहणार -सुल्तानपूर उत्तरप्रदेश)याचा बुडून मृत्यू झाला आहे. गौरव सिंग यादव हा खोपोली येथील एसआरपी इंटरनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत होता. तो त्याच्या मित्रासमवेत काशीद येथे फिरण्यासाठी आले होते. गौरव सिंग हा त्याच्या मित्रासमवेत समुद्री स्नानासाठी काशीद समुद्रात पोहण्यासाठी गेला होता .मात्र समुद्रात खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बेपत्ता झाला. तासाभराच्या अवधीतच त्याचा मृतदेह सापडला. मुरूड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे