| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतमधील दुर्गम भागातील आषाणेवाडी येथील अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या बालकांना शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करण्यात आले. झुगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे यांच्या प्रयत्नांतून डोंबिवली येथील रोटरी क्लब यांनी आशाणेवाडी येथे जाऊन या वस्तूंचे वाटप केले. या विद्यार्थ्यांना गणवेश व लंच सेट यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी रोटरी क्लब डोंबिवली सिटी टायटन प्रेसिडेंट सविता नाझरे, क्लब सेक्रेटरी मंदार भिसे, प्रेसिडेंट इलेक्ट प्रसाद खोत, रोटरीयन विजय नाझरे, तसेच अंगणवाडी शिक्षिका सुनीता घोडविदे, मदतनीस संगीता, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







