| पनवेल | प्रतिनिधी ।
चार गोवंश जातीच्या जनावरांची हत्या केल्याप्रकरणी तळोजा येथील इमरान हनीफ पटेल आणि बाबू यांच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सिडको मैदान, नांदगाव या ठिकाणी इमरान पटेल तसेच त्याचा साथीदार बाबू आणि पळून गेलेला एर्टिगा कार चालक यांनी गोवंश विक्री करण्यासाठी चार जनावरांची हत्या केली आणि तीन जनावरांना बेशुद्ध केले. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.






