| माणगाव | प्रतिनिधी |
विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माणगाव तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत सोमवारी (दि.20) माणगाव तहसीलदार विपीन लोकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समवेत पक्षाचे ज्येष्ठ नेते सदानंद येलवे, जिल्हा सचिव श्रेयश कांबळे, श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संताजी पवार, माणगाव तालुकाध्यक्ष राजू रोडेकर, युवक जिल्हाध्यक्ष समाधान म्हात्रे, करण चव्हाण, महाड शहराध्यक्ष पराग वडके, युवा कार्यकर्ते अनिकेत हाटे, महाड शहर उपाध्यक्ष कुर्बान खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, निवेदनात दिलेल्या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक कार्यवाही करून संबंधित शासन स्तरावर अहवाल सादर करावा. अन्यथा विद्यार्थी युवकांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यास बाध्य राहील, असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.







