। मुरुड जंजिरा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार ,शिवभोजन,गोदामातील हमाल,वाहन चालक ,घरगुती गॅस पुरवठा करणारे वितरक व कर्मचारी,पेट्रोल पंप यावर काम करणार्या सर्व घटकांना कोव्हीड व्हॅक्सिन लस मिळावी यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय व ओम गगनगिरी हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरणसाठी मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली होती.
शासनाच्या योजना व थेट लोकांशी संपर्क येणार्या वरील सर्व यंत्रणा असून त्याचे कोरोना विषाणू पासून संरक्षण होण्यासाठी सर्व सुविधा युक्त असणार्या मोबाईल व्हॅन द्वारे आज तहसील कार्यालयात लसीकरण करण्यात आले आहे.तहसीलदार गमन गावीत यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या लसीकरणाची सुरुवात करण्यात आली.यावेळी मुरुड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनचे अध्यक्ष गिरीष साळी,सचिन कासेकर.नायब तहसीलदार रवींद्र सानप,मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविन्द कौटुंबे ,गोदाम व्यवस्थापक सचिन राजे,पुरवठा अधिकारी केतन भगत,डॉक्टर प्रतापराव शेंडगे,विकासराव शेंडगे,मारुती घेरदे.प्रसाद हंकारे सिस्टर आरती म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुरुड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनचे अध्यक्ष गिरीष साळी यांनी सांगितले कि मुरुड तालुक्यात स्वस्त धान्य दुकाने 32 असून या सर्वांचे लसीकरण होणार असून सर्वाना सुरक्षितता प्रदान होणार आहे.रायगड जिल्हाधिकारी कार्यालय व ओम गगनगिरी हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरणसाठी मोबाईल व्हॅन दिल्याबद्दल त्यांनी विशेष ऋण व्यक्त केले आहेत.सदरील मोबाईल व्हॅन द्वारे शेकडो लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.