अमेरिकेच्या बॉर्बन व्हिस्कीवरील आयात शुल्कात कपात
| रायगड | खास प्रतिनिधी |
विविध देशांमध्ये महागडी दारु (मद्य) पिणार्यांची संख्या कमी नाही. भारतातदेखील शौकीन आहेत. भारत सरकारने अमेरिकन बॉर्बन व्हिस्कीवरील आयात शुल्कामध्ये 50 टक्क्यांनी मोठी कपात केली आहे. अमेरिकेसोबत व्यापक व्यापार करारावर वाटाघाटी सुरू करण्याच्या योजनेच्या घोषणेदरम्यान, सरकारने हे पाऊल उचललो आहे. त्यामुळे बॉर्बन व्हिस्की आता भारतातील नागरिकांना स्वस्तात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महागड्या दारुची बाटली बघून नुसतीच झिंग येणार्यांना आता प्रत्यक्षात ती रिचवता येणार आहे.
13 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यापूर्वीच बॉबर्न व्हिस्कीवरील आयात शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ बॉर्बन व्हिस्कीवरील आयात शुल्कामध्येच कपात करण्यात आली आहे. इतर कोणत्याही दारूच्या ब्रँडवरील आयात शुल्कात कपात करण्यात आली नसून, त्यांचे दर जैसे थे राहणार आहेत. त्यांच्यावर शंभर टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. अमेरिका हा भारताचा बॉर्बन व्हिस्कीचा प्रमुख निर्यातदार देश आहे. भारतात जेवढी दारू आयात केली जाते, त्यातील तब्बल 25 टक्के दारू ही एकट्या अमेरिकेमधून आयात होते.
बॉर्बन व्हिस्की हा अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध आणि जुना दारूचा ब्रँड आहे. ही व्हिस्की प्रामुख्याने मक्यापासून बनवली जाते. बॉर्बन व्हिस्कीची टेस्ट ही थोडीशी गोडसर लागते. त्यामुळे अनेकांची ही फेव्हरेट दारू असून, जगभरात तिचा प्रचंड खप आहे. तुम्ही या व्हिस्कीला थेट प्या किंवा कॉकटेल करा, मात्र तुम्हाला पुन्हा तोच तो अनुभव मिळत असल्याचे मद्यपी सांगतात.
याबाबत माहिती देताना सरकारकडून एक अधिसूचना जारी करण्यत आली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, बॉर्बन व्हिस्कीवर आता 150 टक्के आयात शुल्क आकारण्याऐवजी केवळ 50 टक्केच आयात शुल्क आकारले जाणार आहे. भारताने 2023-24 मध्ये तब्बल 25 लाख डॉलर किमतीची बॉर्बन व्हिस्की अमेरिकेकडून आयात केली होती. अमेरिकेसोबतच यूएई आणि सिंगापूरमधूनदेखील ही दारू आयात केली जाते.
कशी बनते व्हिस्की?
बॉर्बन हा अमेरिकेतील एक प्रसिद्ध आणि जुना व्हिस्कीचा ब्रँड आहे. ही व्हिस्की बनवताना 51 टक्के मक्का वापरला जातो. या दारूची निर्मिती ही जळालेल्या लाकडी पिंपामध्ये बनवली जाते. त्यामुळे या दारूला एक विशिष्ट प्रकारचा स्वाद आणि रंग येतो.
बॉर्बन म्हणजे काय?
बॉर्बन हा एक विशिष्ट अमेरिकन मद्यप्रकार आहे, ज्यामध्ये किमान 51 टक्के मक्याचे पीठ वापरले जाते. त्यामुळे याला व्हॅनिला आणि कॅरामेलसारखी खास गोडसर चव मिळते. जळलेल्या नवीन ओक लाकडी पिंपातील ही व्हिस्की दोन वर्षे ठेवली जाते. ओल्ड फॅशन आणि मिंट जूलिप यांसारख्या कॉकटेल्समध्ये बॉर्बनचा वापर होतो. याशिवाय सॉस, ग्लेझ आणि डेसर्टमध्येही बॉर्बन वापरला जातो.
भारतात किती बोर्बन व्हिस्की विकली जाते?
बोर्बन व्हिस्कीचा अमेरिका हा भारताचा प्रमुख निर्यातदार आहे. भारताच्या प्रमुख निर्यातदार देशांमध्ये अमेरिका, यूएई, सिंगापूर आणि इटली यांचा समावेश आहे. भारतात विकल्या जाणार्या बोर्बन व्हिस्कीपैकी 25 टक्के अमेरिकेतून येते. 2023-24 मध्ये 25 दशलक्ष डॉलर किमतीची बोरबोन व्हिस्की भारतात आयात करण्यात आली. सरकारने इतर स्पिरिटवर 100 टक्के आयात शुल्क कायम ठेवले आहे; परंतु बोर्बन आता पूर्वीपेक्षा स्वस्त होईल.