। पाली । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वाघोशी गावची सुकन्या सुश्मिता सुनिल देशमुख हिने 19 फेब्रुवारी रोजी पंजाबात पार पडलेल्या ओपन क्लासिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत 146 किलो स्क्वॉटमध्ये 3 सुवर्ण व 1 कांस्यपदाची कमाई केली आहे.
पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे पॉवर लिफ्टिंग इंडिया असो.च्या मान्यतेने, एसबीडी इंडियन ओपन क्लासिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 संपन्न झाली. त्यात सुस्मिता देशमुख हि वरिष्ठ व 52 किलो वजनी गटात खेळली. 52 किलो वजनी गटातील स्क्वॉट या प्रकारात 135 किलाचो जुना विक्रम होता. तो मोडीत काढून सुस्मिताने 136 किलो स्क्वॉट स्वतःच्या नावावर करत नवीन विक्रम बनवला आहे. तसेच स्क्वॉट, बेंचप्रेस व 52 किलो वजनी गटात सुवर्णपदक, आणि डेडलिफ्ट या प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे.