| मुंबई | प्रतिनिधी |
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात आज (दि.६) दोषी ठरवले. त्यांच्यावरील घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप कोर्टाने मान्य करून करूणा मुंडे हीच त्यांची पहिली बायको असल्याचे मान्य केले आहे. करूणा यांना दरमहा 2 लाख पोटगी देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. करुणा धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत. त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा. कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये, असे निर्देश आणि1 लाख 25000 रुपयांचा मासिक खर्च देण्यात यावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.