| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
प्रेमप्रकरणात झालेल्या वादातून प्रियकराने त्याच्या प्रेयसीची हत्या केली आहे. जागृती असे या मुलीचे नाव आहे. ती 22 वर्षांची होती. तिचा प्रियकर निकेशने तिची हत्या केली. नवीन पनवेल या ठिकाणी ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी निकेशला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निकेश आणि जागृती हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जागृती ही 22 वर्षांची होती. तीन महिन्यांपूर्वी या दोघांचं ब्रेक अप झालं. या तीन महिन्यांच्या कालावधीत दोघांचा काही संपर्क नव्हता. जे काही घडलं ते ती मुलगी विसरली होती, तिने आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगण्यास सुरुवात केली होती. निकेश मात्र काहीही विसरला नाही. त्याने तिच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. एक दिवस जागृतीला एका मुलाशी बोलताना निकेशने पाहिलं. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आहेत असा संशय निकेशला आला. त्यानंतर त्याने थेट जागृतीचं घर गाठलं आणि तिला जाब विचारण्यास सुरुवात केली. आधी त्याने तिला शिवीगाळ केली आणि मग मारहाणही केली. इतकं करुन तो थांबला नाही त्याने चाकू आणलाच होता याच चाकूने त्याने तिच्यावर वार केले आणि तिची हत्या केली. त्यानंतर स्वतःच्या गळ्यावरुनही सुरु फिरवली आणि आत्महत्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं ज्यामुळे त्याचा जीव वाचला. पोलिसांनी निकेशला अटक केली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलीस आता पुढील तपास करत आहेत.