• Login
Sunday, June 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home पर्यटन

रायगडातील पावसाळी पर्यटन ठप्प

Antara Parange by Antara Parange
June 21, 2026
in पर्यटन, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
रायगडातील पावसाळी पर्यटन ठप्प
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ताम्हिणी घाट, देवकुंड, अंधारबन व खजिना ट्रेक पावसाअभावी ओस

| पाली | प्रतिनिधी |

पाटणूस, भिरा, विळे, रवाळजे व पुण्याच्या सीमेवर असलेला ताम्हिणी घाट आदी परिसरात निसर्गाचा अमूल्य ठेवा दडला आहे. येथील अद्वितीय देवकुंड, रोमहर्षक खजिना व अंधारबन ट्रेक, समृद्ध निसर्ग, फेसाळणारे धबधबे देशभरातील पर्यटकांसाठी दरवर्षी पावसाळी पर्यटनाची मोठी पर्वणी ठरते. मात्र, यंदा जूनचा पंधरवडा उलटून गेला तरी रायगड जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन न झाल्याने या संपूर्ण परिसरातील पावसाळी पर्यटनाचा पुरता हिरमोड झाला आहे. पाऊस लांबल्याने पर्यटक नाराज असून, पर्यटक व निसर्गप्रेमींनी या भागाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

दरवर्षी या दिवसांत ताम्हिणी घाटात सह्याद्रीच्या उंच व रांगड्या डोंगररांगांवरून कोसळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र धबधब्यांच्या फेसाळणाऱ्या पाण्यात भिजण्यासाठी आणि धुक्याची चादर अनुभवण्यासाठी देशभरातून पर्यटक येथे मोठी गर्दी करतात. कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेल्या देवकुंड येथील निसर्गसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. मात्र, यंदा पावसाअभावी येथील जलप्रपात आणि ट्रेकिंगचे मार्ग अद्याप कोरडेच असल्याने सर्व पर्यटन स्थळांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

माणगाव तालुक्यातील पाटणूस, भिरा, विळे व रवाळजे ही गावे सह्याद्रीच्या कुशीत वसली असून, त्यांच्या अवतीभवती अजस्त्र पर्वत रांगा आहेत. या परिसरात नैसर्गिक जैवविविधता प्रचंड आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून कोसळणारे धबधबे पुढे नदीरूपाने अरबी समुद्राकडे आगेकूच करतात. परंतु, यंदा पावसाने दडी मारल्यामुळे हे विलोभनीय दृश्य अजूनही पाहायला मिळालेले नाही.

भिरा येथील मदेवकुंडफ हे झपाट्याने पर्यटनाच्या नकाशावर आलेले सर्वात प्रसिद्ध व विलोभनीय ठिकाण आहे. येथूनच कुंडलिका नदीचा उगम होतो. या भागात पर्यटकांची संख्या दरवर्षी लाखांच्या घरात जाते. तसेच खजिना व अंधारबन डोंगरावरील ट्रेक प्रसिद्ध असून, येथे दुर्मिळ गिधाडांचे वास्तव्य आहे. या उंच डोंगरावरून भिरा धरणाचा विस्तीर्ण जलाशय, नद्या व आकर्षक परिसर दृष्टिक्षेपात येतो. मात्र, सद्यस्थितीत पाऊस नसल्याने येथील पर्यटन थांबले आहे.

विळ्यापासून पुण्याकडे जाताना सुरू होणारा ताम्हिणी घाट पावसाळ्यात जणू स्वर्ग भासतो. घाटातील एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला दरी, खाली उतरलेले ढग आणि हिरवागार निसर्ग पाहून पर्यटक चिंब भिजण्याचा आनंद घेतात. तसेच कुंडलिका नदीतील व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग चा आनंद घेतात. मात्र पावसाअभावी या ठिकाणी पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आमच्या विभागाला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. देवकुंड, ताम्हिणी घाट, अंधारबन ट्रेक, सिक्रेट पॉईंट याठिकाणी देशभरातून पर्यटक येतात. मात्र, यंदा पाऊस लांबल्याने पर्यटकांची पावले थबकली आहेत. याचा थेट फटका स्थानिक व्यावसायिकांना बसला आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आदिवासींचा रोजगारही हिरावला आहे. आम्ही सर्वजण आता दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहोत.

– आंदेश दळवी, माजी उपसरपंच व व्यावसायिक, पाटणूस

ताम्हिणी घाटातील अप्रतिम निसर्ग आणि फेसाळणारे धबधबे मनाला प्रसन्न करतात. दरवर्षी आम्ही या काळात मित्रपरिवारासह येतो. मात्र, यंदा पाऊसच नसल्याने निसर्गाचे ते रूप पाहायला मिळाले नाही आणि हिरमोड झाला आहे.

– गिरीश म्हात्रे, पर्यटक

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspalipali newsraigadsocial media newstourism at Raigad
Previous Post

अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर योग दिन साजरा

Next Post

उल्हास नदी खोलीकरण फास्ट ट्रॅकवर

Antara Parange

Antara Parange

Related Posts

अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर योग दिन साजरा
अलिबाग

अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर योग दिन साजरा

June 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सिडको कार्यालयातून संचिका चोरीला

June 21, 2026
रोह्यात पावसाची हजेरी
sliderhome

रोह्यात पावसाची हजेरी

June 21, 2026
उलव्यात लॉज कनेक्शन पेणपर्यंत
sliderhome

उलव्यात लॉज कनेक्शन पेणपर्यंत

June 21, 2026
आक्षीतील अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
sliderhome

आक्षीतील अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

June 21, 2026
निरोगी, आनंदी राहण्यासाठी योग महत्त्वाचे
sliderhome

निरोगी, आनंदी राहण्यासाठी योग महत्त्वाचे

June 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?