१०१ मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

लायन्स क्लब नागावची सामाजिक बांधिलकी
| अलिबाग | प्रतिनिधी |
लायन्स क्लब नागाव आयोजित, आरसीएफ, थळ सीएसआर फंडातून पुरस्कृत व लायन्स हेल्थ फाऊंडेशन, चोंढी आणि ग्रामपंचायत नागाव यांच्या सहकार्याने फेब्रुवारी ते मार्च यादरम्यान सहा नेत्रचिकित्सा शिबिरांच्या माध्यमातून नागाव परिसरातील 421 ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यातील 101 मोतीबिंदू रुग्णाच्या मोतीबिंदू शस्रक्रिया चोंढी येथील डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या.

आक्षी साई मंदिर येथून या नेत्रचिकित्सा शिबिरास प्रारंभ झाला. त्यानंतर ढवर हनुमान मंदिर, ग्रामपंचायत कावीर, खारगल्ली नागाव येथील जि.प. प्राथमिक शाळा, काशिद मुरूड येथील ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेची माध्यमिक शाळा, बोर्ली या विविध ठिकाणी नेत्रतपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांसाठी लायन्स क्लब नागावचे अध्यक्ष प्रकाश गुरव, सचिव विलास नाईक, खजिनदार सुरेंद्र नागलेकर, सदस्य दीनानाथ पाटील, मृणाल नाईक, श्रेया गुरव, पंढरीनाथ प्रधान, प्राची प्रकाश गुरव, दिलीप गुरव आणि निलेश नाईक, निखिल मयेकर, हर्षदा मयेकर आदी लायन्सने परिश्रम घेतले.

या शिबिरांसाठी आक्षी सरपंच रेश्मा पाटील, सदस्य दिलीप वाळंज, मोहन मगर, ढवर-बेली सरपंच विश्‍वनाथ गावंड, सदस्य मनोज पाटील, स्थानिक ग्रामस्थ विठ्ठल पाटील, कावीर सरपंच राजेंद्र म्हात्रे, कावीर ग्रामस्थ प्रशांत पाटील, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, सरपंच निखील मयेकर, सदस्या हर्षदा मयेकर, मनोज मयेकर, लायन्स क्लब रोहाचे माजी अध्यक्ष रवींद्र घरत, काशिद मुरूड येथील ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिंदे, मुरूड येथील समाजसेवक मकरंद कर्णिक, बोर्ली येथील रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सनी सोगावकर, सामाजिक कार्यकर्ते रमेश दिघे आदींची उपस्थिती आणि सहकार्य मिळाले.

Exit mobile version