| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील 26 गामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी 110 तर सदस्यांसाठी 580 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी थेट सरपंचाचे 33 तर सदस्यांसाठी 203 अर्ज दाखल झाले. उशिरा तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार पेण तालुक्यातील 26 गामपंचयातींंमध्ये 110 उमेदवारी अर्ज यामध्ये पाटणोली व मुंढाणी या ग्रामपंचायतीमध्ये एक-एकच उमेदवारी अर्ज आल्याने या दोन्ही गामपंचायती थेट सरपंच झाल्या आहेत.
तर 26 ग्रामपंचायतींमध्ये 226 जागांसाठी 580 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये करोटीमध्ये थेट सरपंचासाठी 2 तर 9 सदस्य 15 अर्ज, आंबीवलीत थेट सरपंचासाठी 2 तर 7 सदस्य 15 अर्ज, सावरसईत थेट सरपंचासाठी 3 अर्ज तर 9 सदस्य 19 अर्ज, वाशिवलीत थेट सरपंचासाठी 2 अर्ज तर 7 सदस्य 17 अर्ज, कणेमध्ये थेट सरपंचासाठी 5 अर्ज तर 7 सदस्य 18 अर्ज, कोलेटीत थेट सरपंचासाठी 7 अर्ज तर 7 सदस्य 19 अर्ज, निगडेमध्ये थेट सरपंचासाठी 4 अर्ज तर 9 सदस्य 25 अर्ज, वरपमध्ये थेट सरपंचासाठी 8 अर्ज तर 7 सदस्य 21 अर्ज, पाटणोलीमध्ये थेट सरपंचासाठी 1 अर्ज तर 7 सदस्य 15 अर्ज, हमरापूरमध्ये थेट सरपंचासाठी 4 अर्ज तर 9 सदस्य 29 अर्ज, कळवेमध्ये थेट सरपंचासाठी 5 अर्ज तर 11 सदस्य 30 अर्ज, आमटेममध्ये थेट सरपंचासाठी 7 अर्ज तर 9 सदस्य 22 अर्ज, डोलवीत थेट सरपंचासाठी 4 अर्ज तर 9 सदस्य 29 अर्ज, जितेमध्ये थेट सरपंचासाठी 3 अर्ज तर 11 सदस्य 44 अर्ज, दुरशेतमध्ये थेट सरपंचासाठी 4 अर्ज तर 7 सदस्य 19 अर्ज, वरसईमध्ये थेट सरपंचासाठी 4 अर्ज तर 9 सदस्य 17 अर्ज, दादरमध्ये थेट सरपंचासाठी 3 अर्ज तर 13 सदस्य 31 अर्ज, सोनखारमध्ये थेट सरपंचासाठी 5 अर्ज तर 9 सदस्य 17 अर्ज, कोप्रोलीत थेट सरपंचासाठी 4 अर्ज तर 7 सदस्य 17 अर्ज, मसद बु.मध्ये थेट सरपंचासाठी 4 अर्ज तर 7 सदस्य 21 अर्ज, सापोली थेट सरपंचासाठी 3 अर्ज तर 9 सदस्य 22 अर्ज, रोडेमध्ये थेट सरपंचासाठी 6 अर्ज तर 7 सदस्य 24 अर्ज, मळेघरमध्ये थेट सरंपचासाठी 7 अर्ज तर 11 सदस्य 20 अर्ज, खरोशीमध्ये थेट सरपंचासाठी 4 अर्ज तर 9 सदस्य 24 अर्ज, कारावमध्ये थेट सरपंचासाठी 8 अर्ज तर 13 सदस्य 45 अर्ज, मुंढाणीमध्ये थेट सरपंचासाठी 1 अर्ज तर 7 सदस्य 5 अर्ज याप्रमाणे दाखल झाले आहेत.
पेण तालुक्यात आर्थिकदृष्ट्या सबल समजणार्या डोलवी आणि काराव ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन होण्याची शक्यता नाकाराता येणार नाही. थेट सरपंचासाठी सर्वांत जास्त उमेदवारी अर्ज हे काराव आणि वरप ग्रामपंचायतीमध्ये असून, त्यांची संख्या 8 ही आहे. तर लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत जास्त मोठ्या असणार्या ग्रामपंचायती दादर, सोनखार, हमरापूर या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी पहायला मिळणार आहेत. परंतु, खरे चित्र 7 डिसेंबरला स्पष्ट होणार.
दैव जाणिले कोणी
देवाजीच्या मनात काय असते कधीच कोणी सांगू शकत नाही. पेण तालुक्यातील पाटणोली ग्रामपंचायत ही बिनविरोध निवडणूक करणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पाटणोली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाचा उमेदवारी अर्ज नर्मदा प्रकाश वाघमारे हिने भरला. ती बिनविरोध सरपंच झाली; परंतु त्याच दिवशी तिच्या मुलीचे लग्नदेखील होते. एकीकडे आनंदाचे वातावरण, तर दुसरीकडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रकाश वाघमारे हे दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास प्रकाश यांची मृत्यूशी झुंज संपली.
प्रकाश आणि नर्मदा या दामपत्यांना दोन मुले, मुलगा आठवी पास, तर मुलगी बारावी पास आहे. सतत काबाडकष्ट करुन आपला संसार या दाम्पत्याने उभा केला होता. गेली पाच वर्षे दोघेही ग्रामपंचायत पाटणोलीचे सदस्य होते. एकीकडे थेट सरपंच होणे, तर दुसरीकडे आपले सौभाग्याचे लेणं हिराविणे ही गोष्ट खूपच वेदनादायी व मनाला सुन्न करणारी आहे. म्हणनूच विधीलिखित काय आहे, हे कोणीही सांगू शकत नाही.