वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे 12 जणांचा मृत्यू

। जम्मू काश्मीर । वृत्तसंस्था ।

नववर्षाच्या पूर्वसंध्येला माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आहे. चेंगराचेंगरीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नववर्षानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक पोहोचले होते. त्यादरम्यान, चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे अनेक भाविक दर्शन न घेताच परतत आहेत. मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब येथील भाविकांचा समावेश आहे.
सर्व जखमींवर या सर्वांवर कटरा आणि ककरायल नारायण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर वैष्णोदेवीची यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. बचावकार्य सुरू आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांप्रती शोक व्यक्त केला आहे तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे.

Exit mobile version