रायगड जिल्ह्यात 131 रुग्ण

9 जणांचा मृत्यू तर 144 कोरोनामुक्त

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आज गुरुवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी नव्याने 131 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 144 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
गुरुवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 53, पनवेल ग्रामीण 11, उरण 1, खालापूर 4, कर्जत 5, पेण 6, अलिबाग 28, मुरुड 2, माणगाव 5, रोहा 5, सुधागड 2, श्रीवर्धन 2, म्हसळा 1, महाड 6 असे एकूण 131 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर तळा आणि पोलादपूर तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. त्याचप्रमाणे तर पनवेल ग्रामीणमध्ये 4, पनवेल मनपा, उरण, अलिबाग, माणगाव आणि म्हसळा या तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 64 हजार 236 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 58 हजार 587 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 145 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 1 हजार 495 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version