17 वर्षांची मुलगी बेपत्ता

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
अपहरण व बेपत्ता हे असे प्रकार सध्या सगळीकडेच सातत्याने सुरू असतानाच श्रीवर्धन मधील एक 17 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. भरड खोल, श्रीवर्धन येथील फिर्यादी यांची मुलगी, वय-17, ही दि. 4 नोव्हेंबर रोजी काहीच न सांगता घरातून कुठेतरी निघुन गेली किंवा तीच्या अज्ञान पणाचा फायदा घेत तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाकरीता काहीतरी फुस लावून पळवुन नेली.
याबाबत दिघी सागरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं.50/2021 भा.दं.वि.क.363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोसई/श्री.गावडे हे करीत आहेत.

Exit mobile version