। रोहा । वार्ताहर ।
आजारी असलेल्या आजीला बघण्यासाठी अष्टमी येथे आलेला 21 वर्षीय तरुण रोहे शहरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. लक्ष्मी मनोहर मोरे असे 70 वर्षीय आजीचे नाव असून ती अष्टमी रेल्वे स्टेशन शेजारी राहते. ती सतत आजारी पडत असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील दौड येथे राहणारा नातू चेतन शिंदे हा डिसेंबर महिन्यात रोह्यात आला होता. यादरम्यान दि.16 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास बाथरूमला जाऊन येतो असे सांगून निघून गेला. त्यानंतर तो पुन्हा घरी आलाच नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो कोठेही आढळून आला नाही. या विषयी रोहा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शना खाली पोहवा. एस.आर. सकपाळ करित आहेत.