। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुका हिंदू संघटनेच्यावतीने हिंदु धर्म जागरण मेळाव्याचे आयोजन शनिवारी (दि.11) करण्यात आले होते. या मेळाव्यात म्हसळा तालुक्यातुन तसेच जिल्हातुन हजारोंच्या संख्येने हिंदु जन सागर लोटला होता. यावेळी, म्हसळा नगरी अगदी भगवामय झाली होती. दरम्यान, सकाळच्या सुमारास धाविर देव महाराज प्रांगणातुन जय श्री राम जयघोषात व पांडुरंगाच्या गजरात धाविर देव महाराज प्रांगणातुन दिंडी काढण्यात आली होती. या दिंडी सोबत रथामध्ये शिरीष महाराज यांना बसवून मिरवणुक काढण्यात आली होती. या सोहळ्यात तरुण, ग्रामस्थ, महिला, लहान मुलं, अबाल वृद्ध सहभागी होऊन हरिनामाचा गजर करीत दिंडी पुढे सरकत होती. या मेळाव्याचे आयोजन न्यु इंग्लिश स्कुल पटांगणात करण्यात आले होते.