। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव येथील जे.बी. सावंत एज्युकेशन सोसायटीच्या टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलजमध्ये शनिवारी (दि.11) ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत पुस्तक वाचनाचे महत्व या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी 110 विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्याने दर आठवड्याला किमान एक पुस्तक वाचले पाहिजे, असे आवाहन रामजी कदम यांनी केले. तर, ग्रंथपाल अमित बाकाडे यांनी पुस्तक वाचनाची गोडी लागावी म्हणून आपल्या समोर जे लेखक साहित्य उपलब्ध असेल ते वाचावे, म्हणजे आपोआप आपल्याला त्याची सवय होईल, असे मत मांडले. यावेळी पुस्तक परीक्षण व पुस्तक अभिवाचन स्पर्धेत प्राविण्य मिळविणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी, प्रा. हर्षल जोशी, प्रा. अशोक मोरे, ग्रंथपाल अमित बाकाडे, प्रा. डॉ. जगदीश शिगवण, प्रा.डॉ. नितीन मुटकुळे, प्रा.भारत पवार व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होती.