। पनवेल । प्रतिनिधी ।
उरणमधील जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्रजी माध्यमिक वेश्वी शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे विज्ञानाचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले होते. यावेळी, प्रमुख पाहुणे म्हणून ममता प्रीतम म्हात्रे, सुनिता पाटील, प्राचार्य गणेश ठाकूर, शाळा कमिटी चेअरमन चंद्रकांत मुंबईकर हे उपस्थित होते. यावेळी, बोलताना ममता म्हात्रे म्हणाल्या की, शिक्षण घेत असतानाच आपल्या मनातील काही वैज्ञानिक कल्पना मांडण्यासाठी विज्ञान प्रदर्शन हे एक चांगले व्यासपीठ आहे. आजचे छोटे विद्यार्थी सुद्धा आपल्या कल्पना प्रभावीपणे या प्रदर्शनात मांडताना पाहून आम्ही देत असलेल्या आमच्या शैक्षणिक सेवा कार्याबद्दल अभिमान वाटला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.