जोर घाटात पिकअप कोसळली
। माणगाव । प्रतिनिधी ।
असताना चालकाचा वाहनावरील अचानक ताबा सुटल्याने बोलेरो पिकअप हि गाडी रस्त्याकडेच्या खड्यात कोसळल्याने झालेल्या अपघातात 21 जन जखमी झाल्याची घटना बोरवाडी ते जोर गावा दरम्यान घडली. या जखमीत 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारार्थ मुंबई येथे पाठवण्यात आले. उर्वरित 14 जखमीवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेची माहिती मिळताच माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील तसेच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, तसेच पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तर निजामपूर मधील ग्रामस्थांनी या घटनास्थळी एकच धाव घेतली.
निजामपूर येथून बाजार व रेशन घेऊन जोर ता. माणगाव या आपल्या गावी 21 महिला व पुरुष बोलेरो पिकअप जीप गाडी नंबर एम.एच. 46 बी.एफ.0640 या गाडीने ता. 2 मे 2022 सकाळी 11.00 वाजता निघाले. त्यावेळी बोरवाडी ते जोर या रस्त्यावरून जाताना हि पिकअप जीप गाडी एका अवघड वळणावर आली असता या गाडीवरील चालकाचा ताबा सुटून हि गाडी रस्त्याकडेला 100 मीटर अंतरावर जावून खड्यात कोसळल्याने या गाडीला अपघात झाला. त्यात आनंद भाद्रिके वय 65, आशा करंजे 52, राजेंद्र देशमुख, सुप्रिया ढवळे 35, लक्ष्मण ढवळे 60, विठोबा सावंत 60, गंगूबाई ढवळे 60 हे सात प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबई येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. तर उर्वरित मोतीराम वाघमारे 65 रा. धनगरवाडी, राजू तेलंगे, संगीता भद्रिके 45, पांडुरंग भद्रिके, शीतल भद्रिके, वर्षा शेलार, नारायण भद्रिके 55, राधाबाई मोहिते 50, कृषाबाई कुनके, शकुंतला भद्रिके 60, चंद्रकांत करंजे 45, सुभाष कुनके 42, शंकर भद्रिके 78, निलेश भद्रिके बोलेरो पिकअप जीप चालक, सर्व रा. जोर हे 14 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती निजामपूर भागात समजताच अनेक नागरिक व नातेवाईकांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात एकच धाव घेतली. माणगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची उशिरा नोंद करण्यात आली आहे.

दोन टेम्पोंची समोरासमोर धडक
तीन महिलांना उडविले
दोन टेंपोंची समोरासमोर धडक झाल्यानंतर, एका टेप्मोने उडविल्याने तीन पादचारी महिला गंभीर झाल्या.हा अपघात महाड शहरानजिक गांधारपाले गावाजवळ सोमवारी दुपारी घडला. एका टेम्पोचा चालकही या अपघातात जखमी झाला आहे.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास महामार्गावर गांधारपाले या गावानजिक एक आयशर टेम्पो आणि एक छोटा टेम्पोे यांच्यात समोरासमोर धडक झाली. त्यानंतर छोट्या टेम्पोने गांधारपाले येथून चालत महाडकडे जात असलेल्या आशा अशोक शिगवण (वय 50), वनिता सदानंद गायकवाड (वय 60) आणि सुमन वसंत जाधव (वय 65, तिघी, रा. गांधारपाले, ता. महाड) यांना उडविले. त्यात या तिघी गंभीर जखमी झाल्या. या अपघातात छोट्या टेंपोचा चालक अंकूश सरोज हा देखील जखमी झाला आहे. या चारही जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.