पनवेल | वार्ताहर |
दुबई, अबुधाबी येथील कंपनीमध्ये हेल्पर म्हणून कामाला लावण्याच्या बहाण्याने एका भामट्याने केरळ राज्यातील 30 बेरोजगार तरुणांकडून सुमारे 55 लाख रुपये उकळून सदर बेरोजगार तरुणांना अस्तित्वात नसलेल्या कंपनीचे ऑफर लेटर देऊन त्यांना अबुधाबी येथे पाठवून त्यांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. महेश शेवती असे या भामट्याचे नाव असून, नेरुळ पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीसह विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी महेश शेवती याने 2019 मध्ये सीवूड्स सेक्टर-25 मधील सिवूड्स कॉर्नर या इमारतीत आर.एम. मेरिटाईम सर्व्हिसेस प्रा.लि. या नावाने कार्यालय थाटले होते. तसेच आखाती देशामध्ये क्रुड ऑईल पाईपिंग, ड्रिलिंग व रिग (ऑनशोर व ऑफशोर) च्या कामासाठी मुले पाठविण्याचे काम करत असल्याची जाहिरातबाजी केली होती. त्यावेळी कामाच्या शोधात असलेल्या केरळ येथील सहाजुद्दीन हनिफा (36) याने मित्राच्या मदतीने सीवूड्स येथे येऊन आरोपी महेश शेवती याची भेट घेतली होती. त्यावेळी महेश शेवती याने अबुधाबी येथील अडनक ऑईल अँड गॅस कंपनीसाठी रस्टाबोट-हेल्पर म्हणून 50 जणांची व्हॅकेन्सी असल्याचे त्याला सांगितले होते. तसेच सदर कामासाठी 3 लाख रुपये कमिशनच्या स्वरुपात त्याच्याकडे मागितले होते.
सहाजुद्दीन हनिफा याने 50 मुले कामासाठी आणून दिल्यास त्याच्याकडून कमिशनची रक्कम घेणार नसल्याचे महेश शेवती याने सहाजुद्दीन हनिफाला सांगितले. तसेच प्रत्येक मुलाच्या नोकरीसाठी 2 लाख रुपये लागतील असे देखील त्याने सांगितले. त्यानंतर सहाजुद्दीन हनिफा याने केरळ येथे जाऊन त्याच्या ओळखीतल्या सतीश कुमार याच्या माध्यमातून नोकरीची गरज असलेल्या 29 बेरोजगार मुलांची जुळवाजुळव करुन त्यांना सीवूड्स येथे महेश शेवती याची भेट करुन दिली होती. त्यावेळी भामट्या महेश शेवती याने अबुधाबी येथे 56 दिवसांचे काम असेल व 28 दिवसांची सुट्टी असेल व महिन्याला 50 हजार रुपये पगार असेल असे बेरोजगार तरुणांना सांगितले होते. तसेच सदर ठिकाणी काम करण्यासाठी वर्क परमिट व्हिसा, विमान प्रवास भाडे, आबुधाबी येथील ट्रेनिंग यासाठी त्याला प्रत्येकी 2 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते.
त्यावेळी सहाजुद्दीन हनिफा याने महेश शेवतीला याला त्याच्या कामाचे 2 लाख 75 हजार रुपये दिले होते. काही महिन्यानंतर त्याने 29 बेरोजगार तरुणांकडून प्रत्येकी 2 लाख रुपये जमवून ती रक्कमदेखील महेश शेवती याला दिली होती. काही दिवसानंतर भामट्या महेश शेवते याने मुहम्मद ईर्शाद रफिक टेक्निकल सर्व्हीसेस एलएलसी, दुबई या कंपनीच्या लेटरहेडवर 29 बेरोजगार तरुणांना जॉब कन्फर्मेशन झाल्याचे पत्र व्हॉट्सऍपद्वारे सहाजुद्दीन हनिफा याला पाठवून दिल्यानंतर भामट्या महेश शेवती याने मे 2019 मध्ये 29 बेरोजगार तरुणांना अबुधाबी येथे पाठवून दिले होते. मात्र, त्याठिकाणी मुहम्मद ईर्शाद रफिक टेक्निकल सर्व्हीसेस या नावाची कंपनीच अस्तित्वात नसल्याचे सदर तरुणांच्या लक्षात आले. ही बाब भामट्या महेश शेवती याला सांगितल्यानंतर त्याने दुसर्या कंपनीत त्यांना कामाला लावण्याचे आश्वासन दिले.
मात्र, त्याने सदर तरुणांना दुसरीकडे कुठेच कामाला न लावल्याने तसेच व्हिजीट व्हिसाची मुदत संपत आल्याने अखेर त्या तरुणांनी जूनमध्ये केरळ गाठले. त्यानंतर सदर तरुणांनी सीवूड्स येथील भामट्या महेश शेवती याचे कार्यालय गाठून त्याला जाब विचारला. त्यावेळी भामट्या महेश शेवती याने त्यांना दुसर्या कंपनीत कामाला लावण्याचे आश्वासन देऊन वेळ मारुन नेली. मात्र, त्याने सदर तरुणांना कुठेच कामाला न लावल्याने सदर तरुणांनी आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. त्यानंतर भामट्या महेश शेवती याने मागील दोन वर्षापासून पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर फसवणूक झालेल्या या 30 तरुणांनी नेरुळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केल