रायगड जिल्ह्यात 36 रुग्ण; 2 मृत्यू,

207 कोरोनामुक्त, 12 तालुक्यात नवीन रुग्ण नाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गुरुवार दि. 11 नोव्हेंबर रोजी कोरोनाच्या 36 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. उपचारादरम्यान आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात तब्बल 207 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 12 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
गुरुवारी पनवेल महापालिका हद्दीत 31, अलिबाग 2, पनवेल ग्रामीण 2, पेण 1 असे 36 रुग्ण आढळले. तसेच उरण, कर्जत, खालापूर, माणगाव, रोहा, मुरुड , तळा, सुधागड, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या 12 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 71 हजार 555 झाली आहे. यापैकी 1 लाख 66 हजार 865 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 404 वर गेला आहे. सद्यस्थितीत 286 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version