महाडसाठी ३६५ कोटींचा विकासनिधी – गोगावले

ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणार
| महाड | ग्रामीण प्रतिनिधी |
महाड पोलादपूर या तालुक्यातील विविध कामासाठी 365 कोटी 90 लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आल्याची माहिती आ.भरत गोगावले यांनी महाड येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली. उन्हाळी अधिवेशनात विविध कामांना मजुरी दिली असल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाम व जिल्ह्यापरिषद अंतर्गत विविध कामांना प्राधान्य दिले असल्याचे सांगितले जिल्हा परिषदेला स्व निधी जास्त नसल्याने शासनाने जास्तीत जास्त निधी दिले असल्याचे आ गोगावले यांनी सांगितले.

85 कोटी रूपये ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत 45 कि.मी. लांबीचे रस्ते मंजुर त्याकरीता 39.19 कोटी रूपयांची तरतूद तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून संशोधन आणि विकास (ठऊ) लेखाशिर्षाखाली 18 कि.मी. लांबीचे रस्ता मंजुर एकूण निधी 13.15 कोटी निधीची तरतूद रोजगार हमी योजने अंतर्गत स्मशानशेड व अंतर्गत रस्त्यांची कामे याकरीता 5.37 कोटी निधीची तरतूद नगरविकास खात्यातून विविध नगरपालिका व नगरपंचायतींना 15 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.यामध्ये विरेश्‍वर तलाव, कोटेश्‍वरी तलाव,हापूस तलाव याची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

सावित्री नदी, काळ नदी येथील गाळ उपसा करणेकरीता 31 कोटी रूपये निधीची तरतूद करण्यात आली असून गाळ काढण्यात येत आहे महाड मधील तळीये गावासाठी 24.39 कोटी तर पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे साठी 14.90 कोटी असे दोन्ही तालुक्या साठी 39.29 कोटी निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. किल्ले रायगड साठी 5 कोटी रूपयांची तरतूदही सरकारने केली आहे. गेल्या 7 महिन्यात ह्या योजना मंजूर करण्यात आले असून ग्रामीण भागातील विकासाला चालना देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पाठपुरावा करत भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना श्री विरेश्‍वर महाराज मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा व मानवंदना सुरू केली असल्याचे सांगितल.तालुक्यातील वाहनांच्या पासिंग चा प्रश्‍न सोडविणार असल्याचे सांगत मिनीडोअर चा प्रश्‍न सोडविला असल्याचे सांगितले.

Exit mobile version