महाड दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली ५ जणांचा मृत्यू;जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

महाडमध्ये दरड कोसळून 30 घरे मातीखाली दबल्याची माहिती मिळत आहे. महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 km अतंरावर ही घटना घडली. या घटनेत 30 घरे गाडली गेल्यामुळे यामध्ये एकूण 72 नागरिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. तब्बल ४८ तासांनंतर महाड मधील पूरस्थिती ओसरण्यास सुरवात झाली आहे. पावसाने विश्रांती घएतल्याने महाडकरांना दिलासा मिळाला आहे. सावित्री नदीची पूर पातळी मध्यरात्री १ वाजता १०.५० मीटरवर पोहोचली होती. ती सकाळी आठ वाजता ७.५० मीटर पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे मदत व बचावकार्य पुन्हा एकदा सुरु झाले आहे.

रायगड जिल्ह्यातील पाचाड रस्त्यावर पडलेली दरड काढण्यात आली असून पथक तळई दरडग्रस्त भागात निघाले आहे. हेलिकॉप्टर काही वेळेत महाडमध्ये दाखल होऊन राजेवाडी आणि इतर परिसरातील पुरात अडकलेल्या नागरिकांना काढण्यात येईल. लाडोली येथील आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

महाड तालुक्यात राजेवाडी गाव संपुर्ण पाण्याखाली गेले आहे. दरडीमुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. महाडकडे जाताना राजेवाडी गावातील प्रत्येक नागरिक घराच्या वरच्या बाजुस, इमारतीच्या वरच्या बाजुस येऊन मदतीची प्रतिक्षा करीत आहे. परंतु सावित्री नदी किनार्‍या लगत असलेल्या राजेवाडी गावाला सावित्री नदीच्या पुराने विळखा घातला आहे. महाड शहरातुन दोन किमी अतंरावर राजेवाडी गावाकडे मदत पोहचवणे अशक्य झाले आहे. पोलिसांचे पथक रायगड-महाडकडे रवाना झाले आहे.

Exit mobile version